बदलापूर येथील चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरात आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला. या घटनेनंतर राज्यातील अनेक भागातील महिला आणि लहान मुलीवर अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहे. असं असतांना पुण्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पुण्यातील हडपसर भागात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणार्‍या मुलीचा शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

गणेश काकड असे आरोपी शिक्षकाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील एका शाळेत इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणार्‍या मुलीला आरोपी शिक्षक गणेश काकड याने जुलै २०२४ मध्ये पीडितेला घरचा पत्ता विचारला. नंतर मी वर्गामध्ये शिकवत असताना तू माझ्याकडे बघत जा, इकडे तिकडे बघत जाऊ नकोस. मी सुंदर आहे असे पीडित मुलीला आरोपी शिक्षक म्हणाला. त्यावर पीडित मुलीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर शाळेतून पीडित मुलगी घरी जात असताना, तू घरी चालली आहेस का ? मी तुला तुझ्या घरी सोडू का ? तू कुठे राहतेस ? अशी विचारणा करून तिला त्रास द्यायला सुरुवात केली.

Kavita Badla murder case Vasai court sentences four accused to life imprisonment
कविता बाडला हत्या प्रकरण : चार आरोपींना वसई न्यायालयाने सुनावली जन्मठेप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
Man arrested for attempting to rob minor girl Mumbai news
मुंबईः अल्पवयीन मुलीवर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
school Teacher misbehaved with girls
रत्नागिरी शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षकाचे विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत शिक्षकाला केले निलंबित
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
Jaideep Apte , bail , High Court,
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण, जयदीप आपटे याला उच्च न्यायालयाकडून जामीन
Accused of murdering young woman remanded in custody Pune news
पुणे : तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला कोठडी

हे ही वाचा… खराडीत नदीपात्रात तरुणीचा मृतदेह सापडला; शिर धडावेगळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघड

हे ही वाचा… Maharashtra Live News : शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या अपमानाविरोधात राष्ट्रवादीचे सिंधुदुर्गात आंदोलन, इतर बातम्या वाचा एका क्लिकवर…

२६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुलगी शाळेच्या मैदानात उभी होती. त्यावेळी आरोपी शिक्षक काकडने तिच्या जवळ आला आणि तू शिट्टी का वाजवली ? असं विचारत त्याने तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही पुढील काही दिवस आरोपी शिक्षक गणेश काकड याने सातत्याने त्रास देणे सुरूच ठेवले. त्याबाबत पीडित मुलीने आजपर्यंत घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलगी आणि तिच्या आईने पोलीसात तक्रार दिली. आरोपी गणेश काकड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या प्रकरणाबाबत अधिक तपास सुरु असल्याचे पोलीसांनी सांगितले.

Story img Loader