पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात थंडीचा जोर आहे. महाबळेश्वर आणि लोणावळा ही थंड हवेची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र, सध्या तेथील तापमानापेक्षा पुण्यातील तापमान कमी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर फेंगल या चक्रीवादळात होत आहे. हे चक्रीवादळ उत्तर-पश्चिमेकडे सरकत राहील. त्याचा प्रभाव प्रामुख्याने तमिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, केरळ या राज्यांत जाणवण्याचा अंदाज आहे. तसेच, या प्रणालीमुळे राज्यातील हवामान ढगाळ होण्याची शक्यता नाही. गेल्या काही दिवसांपासून हवेतील आर्द्रता कमी होऊन कोरड्या हवामानामुळे दिवसा आणि रात्रीच्या तापमानात सातत्याने तापमानात घट होत आहे. त्यामुळे पुणे शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढत आहे. दिवसा आणि रात्री हुडहुडी जाणवत आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी पुण्यात ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, महाबळेश्वर येथे १०.५, लोणावळा येथे १७.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. लोणावळा आणि महाबळेश्वर थंड हवेची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध असली, तरी पुण्यातील तापमान लोणावळा आणि महाबळेश्वरपेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा – पुणे : कात्रज घाटात बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या
सध्या उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय आहे. फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि मध्य भारतातील हवेतील आर्द्रता कमी होऊ शकते. परिणामी, उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रवाह वाढून रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे. शहरातील थंडी कायम राहू शकते. लोणावळा आणि महाबळेश्वर येथे पुण्यापेक्षा जास्त तापमान दिसत असले, तरी तेथे कमाल आणि किमान तापमानात घट आहे. तर पुण्यातील किमान तापमानात घट होत आहे. तसेच लोणावळा आणि महाबळेश्वर येथे डोंगराळ भागामुळे उत्तरेकडून येणारे वारे अडवले जाऊ शकतात, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिली.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडला ४० वर्षांनंतर मंत्रिपद मिळणार? चंद्रकांत पाटील म्हणाले, ॲडव्हान्समध्ये…
सलग तीन दिवस एक आकडी तापमान
पुण्यातील शिवाजीनगर येथे नोंदवले गेलेले ९.५ अंश सेल्सिअस हे यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचे नीचांंकी तापमान ठरले आहे. तसेच, गेल्या चार वर्षांत नोव्हेंबरमध्ये यंदा पहिल्यांदाच सलग तीन दिवस एक आकडी तापमान नोंदवले गेले आहे.