पुणे: कोथरूडमध्ये अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याच्या आणखी एका साथीदारास राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रत्नागिरी परिसरातून अटक केली.दुचाकी चोरण्याच्या तयारीत असलेल्या इम्रान युनूस खान आणि युनूस याकूब साकी (दोघे रा. रतलाम , मध्यप्रदेश, सध्या कोंढवा) यांना गेल्या आठवड्यात पोलिसांनी अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राथमिक तपासामध्ये हे दोघे फरारी दहशतवादी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे या दोघांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून मूळच्या गोंदियामधील आणि सध्या कोंढवा परिसरात वास्तव्याला असलेल्या अब्दुल कादिर दस्तगीर पठाण याला पोलिसांनी अटक केली होती. या तिघांची एकत्रित चौकशी सुरू आहे.

हेही वाचा- पुणे: जयपूर बॉम्बस्फोटातील आरोपींना राहण्यासाठी दिली जागा, दहशतवाद विरोधी पथकाने केली अटकेची कारवाई

तपासामध्ये रत्नागिरीतील एकाने आर्थिक रसद पुरवल्याची माहिती पुढे आली. त्याला चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले होते. चौकशीत त्याने आर्थिक रसद पुरवली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. या तपासात या चौघांच्या संपर्कांतील परराज्यातील एकाची माहिती पुढे आली. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या साथीदारास शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune terror connection one more arrested from ratnagiri 4th arrest by maharashtra ats rbk 25 rmm
Show comments