पुण्यातील पाषाण तलाव परिसरात प्रेमी युगुलांना बंदी असल्याचा फलक अखेर महानगरपालिकेकडून आज (शनिवार) हटवण्यात आला. महानगरपालिकेच्या या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध झाला होता. अखेर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडूनच हा फलक काढण्यात आला.

पाषाण तलाव परिसरात पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या पक्षी प्रेमींना त्रास होत असल्याचे आणि सुरक्षिततेचे कारण सांगत महानगरपालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला होता. या अजब फतव्यामुळे पुणेकरांमधून संतप्त प्रतिक्रियाही आल्या होत्या.

हेही वाचा : पुण्यातील पाषाण तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना बंदी; पालिकेच्या उद्यान विभागाचा फतवा

या पार्श्वभूमीवर तलावाच्या फाटकावर लावण्यात आलेला फलक महानगरपालिकेकडून काढण्यात आला. विविध संस्था, संघटनांकडून या निर्णयाला विरोध झाला होता. याबाबत महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार आणि उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांना निवेदन देण्यात आले होते.

Story img Loader