मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्ता संघर्षावर आधारित सत्तामंथनाच्या देखाव्याला पोलिसांकडून विरोध करण्यात आला आहे. नरेंद्र मित्र मंडळाकडून साकारण्यात येणाऱ्या या देखाव्याची परवानगी मागण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी नकार दिल्यामुळे मंडळाकडून नवीन देखावा तयार करण्यात येणार आहे. या देखाव्याला कोणत्याही प्रकारचा राजकीय रंग देण्याचा आमचा हेतू नव्हता असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा – पुणे : राज्यातील सत्तांतराचे गणेशोत्सवात प्रतिबिंब

बुधवार पेठ येथील नरेंद्र मित्र मंडळाने राज्यात चाललेला सत्तासंघर्षावर आधारित या देखाव्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असताना पोलिसांकडून या देखाव्याची परवानगी नाकारली आहे. कोणत्याही प्रकारचा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न या देखव्यातून होणार नव्हता असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, शांतता आणि सुव्यवस्थेच्या कारणावरून पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे नवा देखावा सादर करण्याची तयारी मंडळाने सुरू केली आहे.