प्रेमसंबंध तुटल्याच्या रागातून प्रियकराने बदला घेण्यासाठी वेशांतर करुन प्रेयसीच्या घरात चाेरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकास अटक केली असून त्याच्याकडून २८ तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा १४ लाख ६७ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>पुणे : पैगंबर जयंतीनिमित्त रविवारी वाहतुकीत बदल

सुमित बाबु परदेशी (रा. पद्मावती) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. २ ऑक्टोबर रोजी आंबेगाव येथील लक्ष्मी गार्डन सोसायटी भागातील एका बंगल्यात चोरी झाली होती. याबाबत एका नृत्य कलाकार तरूणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पडताळले. संशयित चोरटा सुमित परदेशी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून २८ तोळे सोन्याचे दागिने, रोकड असा १४ लाख ६७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.
फिर्यादी तरूणी आरोपी सुमित याची प्रेयसी होती. प्रेमसंबंध तुटल्यानंतर सुमितने बदला घ्यायचा ठरवले. तिला धडा शिकविण्यासाठी सुमितने समाजमाध्यमावर चोरी कशी करावी, याची माहिती त्याने घातली. त्यानंतर त्याने वेशांतर करून तरुणीच्या घरात चोरी केली. पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल रसाळ, गणेश भोसले, मंगेश पवार, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे आदींनी ही कारवाई केली.