पुणे : बाणेर टेकडीवर फिरायला आलेल्या इशान्येकडील राज्यातील तीन तरुणींना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाइल, तसेच मुद्देमाल लुटून पसार झालेल्या चोरट्याला पोलिसांनी गजाआड केले. चोरट्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

द्रापेत उर्फ विशाल प्रभाकर समुखराव (वय १९, रा. कुंभार चाळ, बोराडेवाडी, चिखली, मूळ रा. म्हाळुंगी, ता. चाकूर, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी विशालबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दुचाकी आणि कोयता जप्त करण्यात आला आहे.

vasai municipal schools
“बजेट वाढवा पण शाळा सुरू करा”, स्नेहा दुबेंकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Only 30 percent of road works were completed during the Eknath Shinde government Mumbai news
‘दोन वर्षांत खड्डेमुक्त मुंबई’चे स्वप्न अधुरेच; शिंदे सरकारच्या काळात रस्त्यांची ३० टक्केच कामे पूर्ण

हेही वाचा – पुण्यातील चार जागांवरून महाविकास आघाडीत तिढा

u

बाणेर टेकडीवर १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी अबिनीयू खांगबबो चवांग (वय ३६, सध्या रा. रोहन निल सोसायटी, बाणेर), तिची मैत्रीण चिंगमलिऊ पामेई, अपर पामेई फिरायला गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी विशाल आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांनी तिघींना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील महागडे मोबाइल संच, इअर बड्स, पिशवी असा मुद्देमाल लुटला होता. अबिनीयू, चिगमलिऊ, अपर मूळच्या नागालँडमधील आहेत. अबिनीयू आणि चिगमलिऊ एका बीपीओत कामाला आहेत. चोरट्यांनी कोयत्याचा धाकाने त्यांना लुटल्यानंतर घाबरलेल्या तिघींनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदविली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा – मावळ विधानसभा: अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा प्रयत्न; आमदार सुनील शेळकेंचा रोख कुणाकडे?

पोलिसांनी तपास सुरू केला. बाणेर टेकडीवर यापूर्वी ईशान्यकडील राज्यातील तरुण आणि त्याच्या मित्राला लुटण्यात आले होते. याप्रकरणात पोलिसांनी चोरट्यांना अटकही केली होती. तांत्रिक तपासात आरोपी विशाल आणि साथीदारांनी लुटमारीचा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना पकडले. पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयानंद पाटील, उपनिरीक्षक प्रवीण चौगले, हवालदार श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, सुधाकर माने, इरफान मोमीन, बाबा दांगडे, श्रीधर शिर्के यांनी ही कारवाई केली.

Story img Loader