पुणे : शहरात गोळीबारांचे सत्र कायम आहे. नऱ्हे भागातील भूमकर चौकात मध्यरात्री एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. पुण्यात दोन दिवसांत गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत. एका बांधकाम व्यवसायिकावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जंगली महाराज रस्त्यावर पिस्तूल रोखून गोळीबाराचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी घडली होती. त्यानंतर हडपसरमधील शेवाळवाडी परिसरात बुधवारी व्यवसायिक स्पर्धेतून एका निवृत्त लष्करी जवानाने एकावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – मावळमध्ये आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, श्रीरंग बारणे २२ तारखेला, तर संजोग वाघेरे २३ एप्रिलला अर्ज भरणार

हेही वाचा – शिरूरमध्ये ‘महागद्दारी’वरून खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यात खडाजंगी

सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भूमकर चौक परिसरात गुरुवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास एका तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या. गणेश गायकवड (रा. वारजे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. काडीपेटी मागितल्याच्या कारणातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मुंबईत अभिनेता सलमान खानच्या घराजवळ झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी शहरातील गुन्हेगारांची झडाझडती घेतली होती. त्यानंतर शहरात गोळीबाराच्या तीन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune third incident of firing in the city firing on youth pune print news rbk 25 ssb