पुणे : नशेसाठी ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल संच चोरून खून करणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने गजाआड केले. याप्रकरणात चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

विलास बाबा वाघ (वय २०), प्रकाश बाबा वाघ (वय १९), भीमा गणेश हिलम (वय २५, तिघे रा. कन्या शाळेजवळ, ओतूर ता. जुन्नर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. नवाब अहमद शेख (वय ७२ वर्षे सध्या रा. ओतूर)असे खून झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. नबाब शेख ओतूरमधील कांदा बाजारात मजुरी करायचे. शनिवारी (८ जून) शेख ओतूर कांदा बाजारात मृतावस्थेत सापडले. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. तेव्हा त्यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर शेख यांचा मुलगा शादाब (वय ४२, रा. निमोण तास, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी याबाबत ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
A young man attempted suicide from the employees building in the Police Commissionerate area
पोलिस आयुक्तालय परिसरातील कर्मचाऱ्यांच्या इमारतीवरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू

हेही वाचा…शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेशवाटप अशक्यच!

या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला. ओतूर बाजार आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले. शेख यांचा खून होण्यापूर्वी बाजार आवराात संशयास्पद फिरत असल्याचे चित्रीकरणात दिसून आले. पोलिसांनी तपास करून आरोपी वाघ, हिलम यांच्यासह चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. नशा करण्यासाठी त्यांनी शेख यांचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न केला. शेख यांनी विरोध केल्यानंतर त्यांचा गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपींनी दिली.

हेही वाचा…Pune Porsche Accident : अगरवाल दाम्पत्यासह तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीसअधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक लहू थाटे, उपनिरीक्षक अजित पाटील, दीपक साबळे, राजू मोमीन, अतुल डेरे, संदीप वारे, अक्षय नवले, अक्षय सुपे, महेश पठारे, देविदास खेडकर, ज्योतीराम पवार, बाळशिराम भवारी, नदीम तडवी यांनी ही कामगिरी केली.