पुणे : मोटारीची काच फोडून सोन्याचे दागिने, रोकड असा दोन लाख ८७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत एकाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोटारचालक शनिवारी सायंकाळी खराडी भागातून निघाले होते. मिठाई खरेदीसाठी त्यांनी मोटार एका मिठाई विक्री दुकानाजवळ सायंकाळी साडेसातच्या सुमारास लावली. मोटारीत ठेवलेल्या पिशवीत सोन्याचे दागिने आणि रोकड असा ऐवज ठेवण्यात आला होता. चोरट्यांनी मोटारीची काच फोडून ऐवज असलेली पिशवी चाेरून नेली. मिठाई खरेदी करुन पंधरा मिनिटांनी ते मोटारीजवळ आले. तेव्हा मोटारीची काच फोडून ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर तपास करत आहेत.

हेही वाचा – एमएचटी-सीईटीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू… कधीपर्यंत भरता येणार अर्ज?

हेही वाचा – मद्यपी रिक्षाचालकाचा बेदरकारपणा प्रवाशाच्या जीवावर; रिक्षा उलटून प्रवाशाचा मृत्यू

सिंहगड रस्ता भागात गेल्या आठवड्यात एका मोटारीची काच फोडून चोरट्यांनी २८ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. याबाबत एका तरुणीने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. शहर, तसेच उपनगरात मोटारीची काच फोडून ऐवज चोरणारी टोळी सक्रीय झाली आहे.

Story img Loader