पुणे : पुणे ते अमरावती दरम्यान नवीन गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ही गाडी आठवड्यातून दोन वेळा धावणार आहे. पुणे-अमरावती एक्स्प्रेस १० मार्चपासून दर शुक्रवारी आणि सोमवारी पुण्याहून रात्री १०.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता अमरावतीला पोहोचेल. अमरावती – पुणे एक्स्प्रेस ही गाडी अमरावतीहून ९ मार्चपासून दर शनिवारी आणि सोमवारी रात्री ७.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.२५ वाजता पुण्याला पोहोचेल. पुणे ते अमरावती या मार्गावरील प्रवाशांना या गाडीमुळे फायदा होणार आहे.

हेही वाचा – चाकणमध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

हेही वाचा – बंगळुरूतील रामेश्वरम कॅफे बाॅम्बस्फोट प्रकरणातील दहशतवादी पुण्याच्या दिशेने? एनआयएकडून तपास सुरू

या गाडीला उरुळी, केडगाव, दौंड जंक्शन, जिंती रोड, जेऊर, कुर्डुवाडी, बार्शी टाउन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा हे थांबे आहेत. या गाडीला एकूण १७ आयसीएफ डबे आहेत. त्यात एक फर्स्ट एसी, एक एसी २ टियर, दोन एसी-३ टियर, ५ स्लीपर क्लास, ८जनरल सेकंड क्लाससह लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन असेल. या गाडीसाठी आरक्षण ९ मार्चपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

Story img Loader