पुणे : पावसामुळे पुणे-मुंबई रेल्वे सेवेला गुरूवारी फटका बसला. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. याचबरोबर अनेक ठिकाणी लोहमार्गांवर पाणी साचल्याने अनेक गाड्यांना विलंब झाला. दरम्यान, शुक्रवारी (ता.२६) धावणाऱ्याही काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या तीन गाड्या रेल्वे प्रशासनाने गुरूवारी रद्द केल्या. बदलापूर-वांगणी दरम्यान लोहमार्गावर पाणी साचल्याने या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात मुंबई-पुणे डेक्कन क्वीन, मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस आणि पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस या तीन गाड्यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिल्याने शुक्रवारी धावणाऱ्या काही गाड्याही रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत. त्यात पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस, मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी रामपाल बडपग्गा यांनी दिली. गाड्या रद्द केल्याने प्रवाशांची ऐनवेळी गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना माहिती देण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात रेल्वेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रवाशांना पर्यायी गाड्यांची माहिती देण्याची व्यवस्था या कक्षाच्या माध्यमातून केली जात आहे, असे बडपग्गा यांनी सांगितले.

हेही वाचा : राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ६७६ टीएमसी, गेल्या पाच दिवसांत १४८ टीएमसीने वाढ

वाठार-पळशी क्रॉसिंग बंद

वाठार ते पळशी दरम्यानचे लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक ४७ देखभाल दुरुस्तीसाठी शुक्रवारी बंद राहणार आहे. पुणे विभागाने ओव्हरहॉलिंगच्या देखभालीच्या कामासाठी शुक्रवारपर्यंत गेट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे गेट बंद केल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. वाठार-पिंपोड-दहिगाव-देऊर, वाठार-दहिगाव- देऊर आणि वाठार-तळीये-बिचकाळे-गुजरवाडी-पळशी अशी वाहतूक वळविण्यात आली आहे.