पुणे : शनिवारवाडा परिसरात पर्यटकाला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाइल संच हिसकावून पसार झालेल्या तीन चोरट्यांना पोलिसांनी पकडले. केशव गणेश कठायार (वय २२), ॲलेक्स वाननिवमी (वय २३), कृष्णातूल बहादूर झरगा (वय ३०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. साहेब मिलन मल्लिक (वय २४, रा. हडपसर) याने या संदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कठायार, वाननिवमी, झरगा हे मूळचे परराज्यातील आहेत. शनिवारवाडा परिसरात ते पदपथावर राहायला आहेत. मल्लिक शनिवारवाडा पाहायला आला होता. त्या वेळी आरोपींनी त्याला गाडगीळ पुतळा चाैकात अडवून धक्काबुक्की केली. त्याच्याकडील मोबाइल संच हिसकावून तिघे पसार झाले.
हेही वाचा >>> पुणे : येरवड्यात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
हेही वाचा >>> पिंपरी : कामाशी बांधिलकी असणारे कार्यकर्ते तयार व्हावेत; माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचे मत
मल्लिकने काही अंतरावर असलेल्या कसबा पेठ पोलीस चौकीत या घटनेची माहिती दिली. त्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक निरीक्षक संतोष शिंदे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रिजवान जिनेडी, मेहबूब मोकाशी, गणेश दळवी, प्रवीण पासलकर, वैभव स्वामी, मोहन दळवी, तुषार खडके आदींनी ही कारवाई केली.