पुणे : घोरपडी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

घोरपडीतील युद्ध स्मारक परिसरातून मुंढव्याकडे जाणारी वाहने केंद्रीय विद्यालय चाैक ते घोरपडी पोलीस चौकीमार्गे जातील. मुंढवा, घोरपडी रेल्वे पुलावरुन युद्धस्मारकाकडे फक्त दुचाकी, रिक्षा आणि मोटारींना प्रवेश देण्यात येणार आहे. मालवाहू वाहने, जड वाहने, तसेच पीएमपी बसला या मार्गाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. घोरपडी युद्धस्मारकाकडे येणाऱ्या जड वाहनांनी रेल्वे उड्डाणपूल (सोलापूर लोहमार्ग), बी. टी. कवडे रस्ता, सोपानबाग चौकातून सोलापूर रस्त्यावर यावे. तेथून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

हेही वाचा – पुणे : खून प्रकरणात सात वर्षे गुंगारा देणारा गजाआड, गुन्हे शाखेची ठाण्यात कारवाई

हेही वाचा – पिंपरी: शेअर ट्रेडिंग अ‍ॅपमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा घालणारी टोळी अटकेत; चार कोटींचे व्यवहार

वाहतूक बदलाबाबत नागरिकांच्या सूचना किंवा तक्रारी असल्यास वाहतूक नियंत्रण शाखा, पोलीस उपायुक्त, येरवडा टपाल कार्यालय, जेल रस्ता येथे लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader