पुणे : मद्यधुंद तरुणाने वाहतूक पोलिसांशी वाद घालत मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी हडपसरमधील मगरपट्टा परिसरात घडली. या घटनेची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली. याप्रकरणी रात्री उशीरा तरुणाला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हेही वाचा – व्यावसायिकतेत लष्कर शिखरावर

हेही वाचा – ‘एफटीआयआय’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा? केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांचे संकेत

हडपसर वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी शनिवारी सायंकाळी मगरपट्टा परिसरातील रासकर चौकात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर ते कारवाई करत होते. त्यावेळी एक जण तिथे थांबलेल्या नागरिकाला दगडाने मारण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी तेथे वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाने त्याला हटकले. वाहतूक पोलिसाने हटकल्याने तरुणाने वाहतूक पोलिसाला मारहाण केली. या घटनेची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली या घटनेची माहिती मिळताच हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक तसेच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. हडपसर पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader