पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहतूक पोलिसांनी मुंढवा, कोरेगाव पार्क, येरवाडा, विमाननगरसह शहरातील वेगवेगळ्या भागात नाकाबंदी करून ८५ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. मध्यरात्रीनंतर शहरात होणारे अपघात, तसेच मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आता अचानक नाकाबंदी करण्यात येणार आहे.

कल्याणीनगर भागात रविवारी मध्यरात्री भरधाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुणासह त्याच्या मैत्रीणीला धडक दिली. अपघातात दोघांचा मृत्यू झाला. अल्पवयीन मोटारचालक मुलगा मित्रांसोबत पार्टी करून कल्याणीनगर भागातून निघाला होता. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी मध्यरात्री वाहतुकीचे नियम धुडकावून भरधाव वेगाने वाहन चालविणारे, तसेच मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. वाहतूक पोलीस, तसेच स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री बारानंतर पहाटेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात नाकाबंदी केली.

in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
thane traffic police
ठाणे: वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले

हेही वाचा…पुणे अपघातातील राजकीय वादात वसंत मोरेंची एन्ट्री; स्थानिक पुढाऱ्यांना इशारा देत म्हणाले, “हिंसक आंदोलन झालं तर…

बुधवारी पहाटेपर्यंत वेगवेगळ्या भागात कारवाई करून १२५५ वाहनचालकांची तपासणी केली. या कारवाईत ८५ वाहनचालकांनी मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले. त्यांच्याविरुद्ध खटले दाखल करण्यात आले असून, बाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दोन लाख २२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. येरवडा, विमाननगर, चतु:शृंगी, मुंढवा, कोरेगाव पार्कसह वेगवेगळ्या भागात ही कारवाई करण्यात आली. मुंढवा आणि सहकारनगर भागात वाहतूक पोलिसांनी सर्वाधिक कारवाई केली.पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळात अचानक नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.