पुणे : कामाचे पैसे मागितल्याने झालेल्या वादातून दोघांवर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना लोहगाव भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. रोहित प्रकाश पारख (वय २९, रा. वडगाव शेरी), अक्षय पाटोळे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी कल्पेश फकीरचंद रंगारी (वय ४२, रा. फाॅरेस्ट पार्क सोसायटी, लोहगाव) याला अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये महानगरपालिका प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर! अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवर कारवाई

हेही वाचा – ‘घटेंगे तो कटेंगे’ हेही लक्षात घेतले पाहिजे, गोविंददेव गिरी यांचे पुण्यात विधान

याबाबत रोहित पारख यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारख आणि त्याचा मित्र पाटोळेने रंगारी यांचे काम केले होते. कामाचे पैसे मागितल्याने रंगारी आणि पारख यांच्यात वाद झाला. पारख आणि पाटोळे रंगारी याच्याकडे कामाचे पैसे मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी रंगारीने पारख यांना शिवीगाळ केली. रंगारीने घरातून कोयता आणला. त्याने पारख यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यावेळी पाटोळेने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी पाटोळे यांच्यावर कोयत्याने वार केले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune two people attacked with sickle for asking for money for work in lohgaon one arrested for attempted murder pune print news rbk 25 ssb