पुणे : भरधाव दुचाकी घसरुन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज परिसरात घडली. अनंत पांडुरंग झुंझार (वय ४४, रा. श्रीराम अपार्टमेंट, आंबेगाव बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत झुंजार यांची पत्नी अक्षता (वय ३४) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अनंत झुंजार हे १९ जानेवारी रोजी सकाळी पाचच्या सुमारास आंबेगाव परिसरातून निघाले होते. त्या वेळी दुचाकीस्वार झुंजार यांचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरली. झुंजार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या झुंजार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक वाघमारे तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा