केंद्र शासनाच्या शास्त्र आणि तंत्रज्ञान विभागातर्फे करण्यात आलेल्या विद्यापीठांच्या सर्वेक्षणात पुणे विद्यापीठातील संशोधनाचा दर्जा उंचावल्याचे दिसून आले आहे. या सर्वेक्षणात विद्यापीठांच्या संशोधनाचा दर्जा दर्शवणारा ‘एच इंडेक्स’ हा निर्देशांक काढला जातो. यात पुणे विद्यापीठाचा एच इंडेक्स ६० आहे. काही वर्षांपूर्वी विद्यापीठाचा निर्देशांक ४४ होता. विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
‘एच’ इंडेक्समध्ये मोठी वाढ झाल्यामुळे विद्यापीठाचे ‘अ’ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. तसेच देशातील पहिल्या चार विद्यापीठांत पुणे विद्यापीठाचा समावेश झाला आहे. देशातील राज्यस्तरीय विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठाचा एच इंडेक्स सर्वात मोठा आहे. यामुळे विद्यापीठातील शास्त्रीय संशोधनासाठी केंद्राची भरीव आर्थिक मदत मिळणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in