पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय आठवडाभरात न घेतल्यास मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असे इशारा सावित्रीबाई फुले नामकरण कृती समितीने दिला आहे.
पुणे विद्यापीठाचा नामविस्तार करून ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे नाव करण्यात यावे अशी मागणी कृती समितीकडून गेली अनेक वर्षे करण्यात येत आहे. याबाबत विद्यापीठाच्या अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेत ठरावही झाला आहे. विद्यापीठाकडून हा ठराव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, तरीही याबाबत काहीही निर्णय होत नसल्यामुळे आंदोलन करण्यात येणार असल्याचे समितीकडून सांगण्यात येत आहे. आतापर्यंत विधिमंडळात तीन वेळा या विषयावर चर्चा झाली. मात्र, नामविस्ताराचा निर्णय घेतला जात नाही. येत्या काळात निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास हा निर्णय आणखी लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामविस्ताराचा निर्णय घेतला जावा, अशी मागणी कृती समितीने केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा