पुणे : विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याची तक्रार, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण अशा घटनांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तणावाचे वातावरण आहे. मात्र, आता घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विद्यापीठाने प्रशासनाने शैक्षणिक संकुलात सभासद नोंदणी, विविध अभियान, कार्यक्रम, उपक्रम, आंदोलनांना मज्जाव केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. विद्यापीठाच्या पूर्वपरवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. विद्यापीठात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या अशैक्षणिक घटनांमुळे विद्यापीठाच्या संकुलाची तुलना दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाशी (जेएनयू) करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांच्या घटनांचा फटका विद्यापीठाच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे विद्यापीठातील प्रशासकीय यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्था दक्ष ‍झाली आहे. विद्यापीठामध्ये येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी, नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. वसतिगृहात केवळ रहिवाशी विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात सभासद नोंदणी, विविध अभियान, कार्यक्रम, उपक्रम, आंदोलन आदी उपक्रम घेण्यासाठी  विद्यापीठ प्रशासन आणि पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. परवानगी न घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune university decision to take legal action if activities campaigns are carried out without permission pune print news ccp 14 amy
Show comments