पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त आणि दूरस्थ अध्ययन प्रशालेद्वारे राबवल्या जाणाऱ्या दूरशिक्षण अभ्यासक्रमांना गेल्या तीन वर्षांत वाढता प्रतिसाद आहे. नोकरी-व्यवसाय करताना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणक्रम पूर्ण करण्याकडे कल असल्याचे दिसून येत असून, तीन वर्षांत विद्यार्थिसंख्या दुपटीहून अधिक वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पूर्वी विद्यापीठातर्फे बहिस्थ अभ्यासक्रम राबवण्यात येत होते. मात्र विद्यापीठाने २०१९-२०पासून मुक्त आणि दूरस्थ अध्ययन प्रशाला या विभागाची स्थापना करून दूरशिक्षण शिक्षणक्रम सुरू केले. कला, वाणिज्य पदवी, पदव्युत्तर पदवी, व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर (एमबीए) शिक्षणक्रम सुरू करण्यात आले. विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार २०१९-२०मध्ये पदवीसाठी २ हजार ७३०, पदव्युत्तर पदवीसाठी ४ हजार ३१० आणि एमबीए शिक्षणक्रमासाठी २५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. तर २०२०-२१मध्ये पदवीसाठी ४ हजार ९१९, पदव्युत्तरसाठी ८ हजार ८२ आणि एमबीएसाठी ४३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. २०२१-२२मध्ये पदवीसाठी ५ हजार ८८४, पदव्युत्तरसाठी ७ हजार १२४ आणि एमबीएसाठी २९५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले.

 विद्यापीठाच्या मुक्त आणि दूरस्थ अध्ययन प्रशालेचे संचालक डॉ. वैभव जाधव म्हणाले, की नोकरी-व्यवसाय करताना दूरशिक्षणाद्वारे शिक्षण पूर्ण करता येऊ शकते किंवा उच्च शिक्षण प्राप्त करता येऊ शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या, कामाच्या गरजेमुळे शिक्षण राहून गेलेले अनेक लोक या शिक्षणक्रमाला प्रवेश घेतात. विशेषत: या शिक्षणक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रवेशसंख्या वाढत आहे. येत्या काळात दूरशिक्षणाला ऑनलाइन शिक्षणक्रमाचीही जोड देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

प्रवेशसंख्या वाढण्याची शक्यता

विद्यापीठ अनुदान आयोगाने अलीकडेच घेतलेल्या निर्णयानुसार ऑनलाइन, दूरशिक्षण शिक्षणक्रमांनाही पारंपरिक पदवीची समकक्षता देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात दूरशिक्षण, ऑनलाइन शिक्षणक्रमाला प्रवेश घेण्याचा कल वाढण्याची शक्यता आहे. 

प्रवेश घेण्याची संधी

 सध्या दूरशिक्षण पदवी आणि पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. कला, वाणिज्य पदवीसाठी २९ ऑक्टोबरपर्यंत, पदव्युत्तर पदवीसाठी ३० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी करून अर्ज भरता येईल.