पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राज्यस्तरीय सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा (सेट) ७ एप्रिलला होणार आहे. पारंपारिक पद्धतीने (ऑफलाइन) होणारी ही शेवटची परीक्षा असून, या पुढील परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे आणि सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी १९९५पासून सेट परीक्षा विद्यापीठामार्फत घेतली जाते. एकूण ३२ विषयांसाठी ही परीक्षा घेण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : प्रेमविवाहाची इच्छा अधुरी, ट्रकचालकाचा अपघाती मृत्यू; तरुणी गंभीर जखमी

१७ शहरांमधील सुमारे २६२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. कोणत्याही विद्याशाखेतील पदव्युत्तर पदवीला ५५ टक्के गुण (राखीव ५० टक्के) प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना आणि शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेचा अर्ज भरता येणार आहे. इंग्रजी आणि मराठी या दोन माध्यमात ही परीक्षा देता येणार आहे. मार्चमध्ये झालेल्या ३८व्या सेट परीक्षेसाठी सुमारे १ लाख २५ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.