व्यवस्थापन शाखेची परीक्षा देता आहात? तुमच्या मोबाइल फोनवर व्हॉट्सअ‍ॅपची सोय आहे? मग काळजी करू नका! परीक्षा सुरू होण्याच्या २० मिनिटे आधी तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर थेट प्रश्नपत्रिकाच तुम्हाला मिळेल.. काही विद्यार्थ्यांना भलताच दिलासा देणारी ही पेपरफुटी गेले तीन दिवस पुण्यातील महाविद्यालयांत घडत आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून ‘लोकसत्ता’च्या हाती ही माहिती आली आहे. पुणे विद्यापीठाने परीक्षांच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर पोहोचवण्यासाठी ‘ऑनलाइन’ यंत्रणा सुरू केली खरी, पण या यंत्रणेच्या सुरक्षिततेबाबत योग्य काळजी घेतली न गेल्याचेच या उदाहरणातून समोर आले आहे.
सोमवारपासून व्यवस्थापन शाखेच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांना ऑनलाइन पोहोचवल्या जातात. प्रत्येक परीक्षा केंद्राला विद्यापीठाकडून मिळालेला पासवर्ड वापरून त्यांनी प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून घ्यावी आणि त्याच्या झेरॉक्स प्रती काढून त्या ठरलेल्या वेळेला विद्यार्थ्यांना वाटाव्यात अशी ही पद्धत आहे. प्रत्यक्षात मात्र गेले तीन दिवस परीक्षा सुरू होण्याच्या १५-२० मिनिटे आधीच विद्यार्थ्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर प्रश्नपत्रिका मिळत आहेत. विशेष म्हणजे महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठीचा पासवर्ड मिळाला की लगेच ती प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर पसरवली जात आहे.
व्यवस्थापन शाखेच्या परीक्षांमध्ये असलेले काही प्रश्न अगदी शेवटच्या क्षणी कळले तरी परीक्षेत उत्तीर्ण होण्याइतपत गुण मिळवण्यासाठी ते विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा