पुणे: वेदनाशामक, तसेच भुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा नशेसाठी वापर करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. बेकायदा औषधांची विक्री करणाऱ्या एका तरुणीला हडपसर पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून एक लाख रुपयांच्या मेफेटरमाईन सल्फेट औषधाच्या (टर्मिन) १६० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

अंबिका उर्फ नेहा आनंदसिंह ठाकूर (वय २६, रा. माळवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२६ डिसेंबर) हडपसर पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी हडपसर भागात राहणारी अंबिका ठाकूर ही वेदनाशामक, तसेच भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे यांच्या पथकाने तिला ताब्यात घेतले. तिच्याकडून मेफेटरमाईन सल्फेट या औषधाच्या १६० बाटल्या जप्त करण्यात आल्या.

Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas: “प्राजक्ताताई माळीही परळीत येतात…”, परळी पॅटर्नचा उल्लेख करत सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर टीका
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ratnagiri, Shivaji Maharaj, historical treasure,
रत्नागिरी : राजापुरातील रायपाटण येथे सापडला शिवकालीन ऐतिहासिक ठेवा
Mika Singh angry because Anant Ambani did not gift him 2 crore
अनंत अंबानीने २ कोटींचे घड्याळ न दिल्याने प्रसिद्ध गायक नाराज; लग्नात किती मानधन मिळालं? म्हणाला, “५ वर्षे आरामात…”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…

हेही वाचा – पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक

अंबिका ठाकूर हिच्याकडे औषध विक्रीचा परवाना नाही, तसेच तिच्याकडे औषधनिर्मिती अभ्यासक्रमाची (फार्मसी) पदवी नाही. डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधाचा वापर केल्यास दुष्परिणाम होतात, तसेच औषधाचे सेवन करणाऱ्याच्या आरोग्यास गंभीर इजा पोहोचू शकते. ठाकूरला याबाबतची माहिती होती. हडपसर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, निलेश किरवे, गायत्री पवार यांनी ही कामगिरी केली.

हेही वाचा – पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात

चारशे ते पाचशे रुपयांना विक्री

अंबिका ठाकूर ही नशा करायची. तिने यापूर्वी व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतले होते. त्यानंतर तिने नशेसाठीऔषध विक्री सुरू केली. औषधाच्या बाटलीची ती चारशे ते पाचशे रुपयांना विक्री करत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधाची विक्री, तसेच सेवन करण्यास बंदी आहे. तिने औषधांच्या बाटल्या कोठून आणल्या, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. यापूर्वी पोलिसांनी नशेसाठी औषधांचा वापर, तसेच विक्रीचे प्रकार उघडकीस आणले आहेत.

Story img Loader