पुणे : एकदा निवडून आलेला आमदार परत निवडून येत नाही, असा इतिहास असलेल्या मतदारसंघात यंदा इतिहास बदलण्यासाठी सहयोगी पक्ष आणि नेत्यांची ‘मैत्री’पूर्ण साथ आवश्यक ठरणार आहे. विद्यमान आणि माजी आमदारात सामना असल्याने अटतटीच्या बनलेल्या या लढतीत अन्य एक माजी आमदार काय भूमिका बजावतात, यावर अनेक समीकरणे अवलंबून आहेत.

कल्याणीनगर येथे मे महिन्यात झालेल्या ‘पोर्श कार’ अपघात प्रकरणामुळे चर्चेत आलेले राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर विश्वास दाखवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वडगाव शेरीमधून उमेदवारी दिली आहे. तर, भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार बापू पठारे यांना आमदार टिंगरे यांच्याविरोधात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात होणारी लढत माजी विरुद्ध विद्यमान आमदार अशी होणार आहे.

Congress Secretary Sandesh Singalkar filed a complaint against Modi, Shah, and Nadda with Election Commission
संविधान बदल अन् ‘ चारसो पार’ चा नारा:मोदी, शाहांविरुद्ध एफआयआर करा,काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Bawankule called meeting to make history in deoli assembly constituency
कामाला लागा आणि इतिहास घडवा भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात,‘…तर खैर नाही’
navneet rana
अमरावती जिल्‍ह्यात उपद्रवमूल्‍य वाढविणारा प्रयोग
In Kolhapur many prominent office bearers and activists openly supported opposition
कोल्हापुरात स्वपक्षाविरोधात अनेक नेते मैदानात
maaharashtra assembly election 2024 open support to opposition against party candidate in kolhapur vidhan sabha constituency
कोल्हापूरमध्ये पक्षाच्या उमेदवाराविरोधात विरोधकांना उघड मदत
Pune People Representative, Pune Municipality,
नेता कोणाला म्हणायचे?
Movements need to connect with mainstream politics says Jalinder Patil
चळवळींनी प्रवाहातील राजकारणाशी जोडून घेणे आवश्यक – जालिंदर पाटील

हेही वाचा : चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

या लढतीत माजी आमदार आणि यंदाही इच्छुक असलेले भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला सोडण्यात आला. त्यामुळे उमेदवारी भरण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत इच्छुक असलेले मुळीक संधी न मिळाल्याने नाराज झाले. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून मुळीक यांची नाराजी दूर केली. विधान परिषदेसाठी संधी देण्याचा शब्द त्यांनी दिल्याने महायुतीचे उमेदवार टिंगरे यांच्या प्रचारात मुळीक सक्रिय झाले. गेल्या आठवड्यापासून मुळीक प्रत्येक ठिकाणी आमदार टिंगरे यांच्याबरोबर फिरताना दिसत आहेत. मात्र, त्यांचे काही पदाधिकारी अद्यापही नाराज असल्याने त्यांना सक्रिय करण्याचे आव्हान महायुतीपुढे आहे.

वडगाव शेरी हा स्वतंत्र मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आल्यानंतर बापू पठारे यांना पहिले आमदार होण्याचा मान मिळाला. दहा वर्षांपूर्वी २०१४ मध्ये मोदी लाटेमध्ये भाजपचे आमदार जगदीश मुळीक यांनी पठारे यांचा पराभव केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे सुनील टिंगरे यांनी मुळीक यांना पराभवाची धूळ चारली. त्यानंतरच्या घडामोडींत भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीची (शरद पवार) तुतारी हाती घेतलेले बापू पठारे आता विरोधी उमेदवार आहेत. त्यांच्या नात्यागोत्यातील माणसे या मतदारसंघात असल्याने या निवडणुकीत त्यांना काही प्रमाणात फायदा होऊ शकतो.

हेही वाचा : पुणे: सावधान ! महापालिकेच्या इमारतीमध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश कराल तर…!

वडगाव शेरी मतदारसंघ पुणे शहराच्या ईशान्य भागात येतो. येरवडा, विश्रांतवाडी, लोहगाव, खराडी असा आयटी कंपन्यांचा परिसर या मतदारसंघात आहे. मजूर, व्यापारी, आयटी कर्मचारी, इतर नोकरदार असा मोठा वर्ग येथे आहे. येरवडा भागात झोपडपट्टीचा भाग मोठा असून, निवडणुकीत हा वर्ग महत्त्वाची भूमिका बजावतो. स्थानिक मतदारांव्यतिरिक्त शेजारी असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील, तसेच राज्यातील विविध भागांतील नागरिक नोकरीनिमित्त या मतदारसंघात स्थायिक झाले आहेत. पोर्श अपघातानंतर या भागातील उच्च मध्यमवर्गीयांचा रोष स्थानिक आमदाराला सहन करावा लागला आहे. विरोधक हाच मुद्दा गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा आणत आहेत. हा मुद्दा ‘टर्निंग पॉइंट’ ठरणार का, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा : भाजपच्या चिंचवडच्या गडात शरद पवार यांचा पहिल्यांदाच रोड-शो; नागरिकांचा प्रतिसाद

असा आहे मतदारसंघ…

एकूण मतदार : ५,०३,५३९

पुरुष मतदार : २,५९,४५३

महिला मतदार : २,४३,९८४

तृतीयपंथी मतदार : १०२