पुणे : परराज्यातून आवक घटल्याने बटाट्याच्या दरात वाढ झाली आहे. फ्लाॅवर, शेवग्याच्या दरात घट झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (११ फेब्रुवारी) राज्य, तसेच परराज्यांतून ८५ ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्यात १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. परराज्यातून बटाट्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली असल्याची माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा : ‘नीट-यूजी’ची अर्ज प्रक्रिया सुरू, यंदा परीक्षा होणाऱ्या शहरांच्या संख्येत वाढ

कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून ४ ते ५ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो पावटा, मध्यप्रदेश आणि राजस्थानमधून १० ते १३ टेम्पो मटार, राजस्थानातून १० ते १२ टेम्पो गाजर, मध्य प्रदेशमधून ६ ते ७ टेम्पो लसूण, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून २० ते २५ ट्रक बटाट्याची आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली. पुणे विभागातून सातारी आले ६०० ते ७०० गोणी, टोमॅटो १० ते १२ हजार पेटी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, पावटा ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, काकडी १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा १०० ट्रक अशी आवक झाली.

Story img Loader