पुणे : या आठवड्यात मटार उसळ करण्याचा प्लॅन असेल तर त्याचे या आठवड्यातील दर काय आहेत ते नक्की पाहून घ्या. आवक कमी झाल्याने मटारच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. आवक कमी झाल्याने लसूण आणि मटारच्या दरात वाढ झाली. फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (२५ ऑगस्ट) राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ८ ते १० टेम्पो कोबी, कर्नाटक आणि गुजरातमधून ३ ते ४ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून २ ते ३ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातील इंदूर भागातून ७ ते ८ टेम्पो गाजर, गुजरातमधून २ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून ७ ते ८ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले ५०० ते ६०० गोणी, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो ९ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई, सातारा परिसरातून मटार ७ ते ८ टेम्पो, काकडी १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर ८ ते १० टेम्पो, भुईमूग शेंग ६० गोणी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा ९० ते १०० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ४५ ते ५० टेम्पो बटाट्याची आवक झाली.

farmers anger continues in 70 constituencies over soybean msp
७० मतदारसंघांत सोयाबीन ‘रोष’
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
onion shortage Mumbai
शंभरी गाठलेल्या कांद्यामुळे ग्राहक जेरीस, जाणून घ्या, शेतकऱ्यांना किती दर मिळतो, ग्राहकांना किती रुपये मोजावे लागतात
Moringa or drumstick
Fact check : खरंच शेवग्यामध्ये दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रथिने असतात? तज्ज्ञांनी केला खुलासा
what is the reason that Sea fish became expensive
मासे परवडत नाहीत, मत्स्याहारींनी करायचे तरी काय?
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi
वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी; नाश्त्यामध्ये करा पर्पल कॅबेज सॅलेडचा समावेश, ही घ्या सोपी रेसिपी

हेही वाचा : पुणे : वीर गोगादेव उत्सवानिमित्त लष्कर भागात उद्या वाहतूक बदल

कोथिंबीर, मेथी, शेपू, करडईच्या दरात अल्पशी वाढ

मागणी वाढल्याने कोथिंबीर, मेथी, शेपू, करडई आणि अंबाडी या पालेभाज्यांच्या दरात अल्पशी वाढ झाली. कांदापात, मुळे, राजगिरा, चाकवत, पुदीना, चवळई, पालकचे दर स्थिर आहेत. तरकारी विभागात रविवारी कोथिंबीर दीड लाख जुडी, मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर – १५०० ते २००० रुपये, मेथी – १५०० ते २००० रुपये, शेपू – १००० ते १५०० रुपये, कांदापात – ८०० ते १५०० रुपये, चाकवत – ७०० ते ८०० रुपये, करडई – ५०० ते ८०० रुपये, पुदिना – ५०० ते १००० रुपये, अंबाडी – ४०० ते ८०० रुपये, मुळे – ८०० ते १५०० रुपये, राजगिरा – ४०० ते ७०० रुपये, चुका – ८०० ते १००० रुपये, चवळई – ४०० ते ७०० रुपये, पालक – ८०० ते १५०० रुपये.

हेही वाचा : शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे झाले ‘सक्रिय’? हे आहे कारण…!

लिंबू, डाळिंब पपईच्या दरात वाढ

फळबाजारात डाळिंब, पपई, लिंबांच्या दरात वाढ झाली. पेरूच्या दरात घट झाली असून, अननस, मोसंबी, संत्री, कलिंगड, खरबूज, सीताफळ, चिकूचे दर स्थिर असल्याची मााहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी अननस ५ ट्रक, मोसंबी ५० ते ६० टन, संत्री २ ते ३ टन, डाळिंब ५० ते ६० टन, पपई १० ते १५ टेम्पो, लिंबे एक हजार ते एक हजार ३०० गोणी, कलिंगड २ ते ३ टेम्पो, खरबूज २ ते ३ टेम्पो, चिकू एक हजार खोकी, पेरू ८०० प्लास्टिक जाळी (क्रेट). सीताफळ २० ते २५ टन अशी आवक झाली.

मटारचे दर

घाऊक बाजार (१० किलो) – ६०० ते ८०० रुपये
किरकोळ बाजार (एक किलो ) – ८० ते १०० रुपये