पुणे : विधानसभा निवडणुकीत विविध पक्षांच्या एकूण ११ नगरसेवकांनी आमदार होण्यासाठी नशीब आजमाविण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी केवळ भाजपच्या एका माजी नगरसेवकाला आमदार पदाची लाॅटरी लागली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी नगरसेवक, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना आमदार होण्याची संधी मिळाली असून, अन्य दहा नगरसेवकांचा स्वप्नभंग झाला आहे.

विधानसभा निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी अशी झाली. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) असे तीन पक्ष तर, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) असे पक्ष एकत्रित होते. यातील सर्वच प्रमुख पक्षांतील एकूण ११ माजी नगरसेवक वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. या ११ नगरसेवकांनी शहरातील सहा आणि ग्रामीण भागातील एक अशा सात मतदारसंघांतून निवडणूक लढविली होती. त्यामध्ये दोन माजी महापौर आणि एक उपमहापौर, यांचाही समावेश होता.

Delhi Assembly Elections 2025 Seven AAP MLAs resign
‘आप’च्या सात आमदारांचे राजीनामे; पक्ष नेतृत्व विचारसरणीपासून दूर जात असल्याचा आरोप
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
waqf board amendment bill 2024
Waqf Board Bill: वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भातल्या बैठकीत सत्ताधाऱ्यांच्या १२ सुधारणा मंजूर, विरोधकांच्या सर्व सुधारणा फेटाळल्या!
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका
Waqf Board Bill JPC meeting
Waqf Board Bill: संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत राडा; अरविंद सावंत, असदुद्दीन ओवेसींसह १० खासदार निलंबित
hane rural areas thane district residents homes Central and State government Gharkul scheme
ग्रामीण भागातील १५ हजारहून अधिक रहिवाशांना मिळाले स्वप्नातले घर, केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकूल योजना प्रगतीपथावर
margin of victory in elections depends on voter participation IISER Pune developed model
निवडणुकीतील विजयाचे अंतर मतदारांच्या सहभागावर अवलंबून; ‘आयसर पुणे’ने विकसित केले मॉडेल

हेही वाचा : आत्मचिंतनाऐवजी काँग्रेसला वादाचे ग्रहण, पुण्यात काँग्रेस भवनातील महिला शहराध्यक्षांच्या कार्यालयावरून वाद

कसबा मतदारसंघातून भाजपचे हेमंत रासने, काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार, पुण्याच्या पहिल्या महिला महापौर कमल व्यवहारे, शिवाजीनगरमधून काँग्रेसचे दत्ता बहिरट, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक मनीष आनंद, हडपसर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे माजी गटनेते साईनाथ बाबर, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे माजी महापौर प्रशांत जगताप, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे बंडखोर उमदेवार गंगाधर बधे, पर्वती मतदारसंघातून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार, माजी उपमहापौर आबा बागुल, कोथरूड मतदारसंघात मनसेचे माजी गटनेते किशोर शिंदे, खडकवासला मतदारसंघातून राष्ट्रवादीचे (शरद पवार) सचिन दोडके या नगरसेवकांनी निवडणूक लढविली, तर शहरातील भाजपचे माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी भोर मतदारसंघात बंडखोरी करून निवडणूक लढविली. या पैकी केवळ हेमंत रासने यांना आमदार होण्याची संधी मिळाली आहे.

हेही वाचा : डाॅ. बाबा आढाव यांचे उद्या आत्मक्लेश उपोषण

रासने यांनी दोन वर्षांपूर्वी झालेली कसबा पोटनिवडणुकही लढविली होती. मात्र, त्या वेळी त्यांचा काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी धक्कादायक पराभव केला होता. त्या पराभवाची सव्याज परतफेड रासने यांनी या निवडणुकीत केली. रासने यांनी धंगेकर यांना १९ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभूत केले. रासने वगळता अन्य कोणत्याही माजी नगरसेवकाला मोठ्या प्रमाणावर मतदान झालेले नसल्याचेही मतमोजणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मात्र, काही नगरसेवकांची बंडखोरी भाजप महायुतीच्या पथ्यावर पडल्याचेही दिसून येत आहे.

Story img Loader