पुणे : कौटुंबिक वादातून तरुणाला बेदम मारहाण करुन त्याचा खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना वानवडीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महेंद्र अनिल कवडे (वय ३६, रा. गंगा क्वीन सोसायटी, घोरपडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. कवडे यांनी याबाबत मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कवडे आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. कौटुंबिक कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वानवडीतील शितळादेवी मंदिर चौकात कवडे यांना आरोपी आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी अडवले. कवडे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, तसेच त्यांच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार केला. मारहाणीत कवडे गंभीर जखमी झाले.

कवडे यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. कवडे यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे तपास करत आहेत.

तरुणाला जिवे मारण्याची धमकी

धानोरी भागात वादातून तरुणाला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चौघांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत विकी लक्ष्मण जाधव (वय ३०, रा. गोकुळनगर, धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. आरोपी वराह पालनाचा व्यवसाय करतात. जाधव यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत त्यांनी वराह पालन व्यवासाय सुरू केला. जाधव यांनी आरोपींना मनाई केली. त्यानंतर आरोपींनी जाधव यांना तीक्ष्ण शस्त्राचा धाक धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक सुडके तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune wanwadi incident youth brutally beaten in a family dispute pune print news rbk 25 ssb