लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शहरातील आमदारांनी पुण्याच्या पाण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले. शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील पाणीपुरवठ्याचा प्रश्न असल्याची कबुली राज्य सरकारकडून देण्यात आली. मात्र या गावांना अस्वच्छ पाणीपुरवठा होत नसल्याचा दावाही करण्यात आला. तसेच शहराचा वाढता विस्तार आणि महापालिकेने केलेली वार्षिक २०.९० अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची मागणी मान्य होणार का, असा प्रश्नही आमदारांकडून विचारण्यात आला.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आमदार काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. त्यावर समाविष्ट ३४ गावांतील पाणीटंचाईसह शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत भाजप आमदार भीमराव तापकीर, काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि संजय जगताप, तसेच अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला.

आणखी वाचा-पुणे: चित्रपटगृहात महिलेशी अश्लील वर्तन; तिघे अटकेत

महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये पाण्याचा प्रश्न असल्याची कबुली मुख्यमंत्री यांच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. मात्र अस्वच्छ पाणीपुरवठा होत नसून समाविष्ट गावांमधील पाणी समस्या सोडविण्यासाठी महापालिकेकडून सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट- डीपीआर) करण्याचे काम सुरू आहे, असे सामंत यांनी सांगितले.

शहरातील बहुचर्चित समान पाणीपुरवठा योजनेचे रखडलेले काम, टँकरमाफियांवरील नियंत्रण, पेठांमधील पाण्याच्या प्रश्नासंदर्भात आमदार रवींद्र धंगेकर यांनी विचारणा केली. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता महापालिकेच्या प्रस्तावानुसार शहराला वार्षिक २१ अब्ज घनफूट एवढा पाणीसाठा मंजूर होणार का, असा प्रश्नही त्यांनी विधिमंडळात उपस्थित केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune water debate in monsoon session of state legislature pune print news apk 13 mrj