पुणे शहरातील नागरिकांना अनेक दिवसांपासून पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी भाजपाचे नेते तसेच खासदार गिरीश बापट यांनी महापालिका आयुक्तांच्या घरी जाऊन पाण्याचा प्रेशर चेक केलं होतं. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये राजकारण तापल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आज राष्ट्रवादीने गिरीश बापट यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने केलेल्या आंदोलनामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘पुणे महापालिकेवर प्रशासक नेमल्यानंतर गिरीश बापट यांनी महापालिका आयुक्तांच्या घरी का भेट दिली. ज्यावेळी महापालिकेत भाजपाची सत्ता होती तेव्हा ते का गेले नाहीत?’, ‘अहो बापट करू नाटक’, ‘पुणेकर नागरिकांची फसवणूक करणार्‍या गिरीश बापट राजीनामा द्या’, अशा घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आल्या.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sagar Meghes pointed speech front of nitin gadkari is getting discuss
‘तीनदा पराभव, डॉक्टर अन् राजकारणाचा किडा…’ सागर मेघे यांच्या टोकदार भाषणाची गावभर चर्चा…
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
Extravagance of one lakh crores by rulers party in state Priyanka Chaturvedis allegation
राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून एक लाख कोटीची उधळपट्टी, ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचा आरोप
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !

“शहरातील अनेक भागात सध्या पाणी पुरवठा विस्कळित आहे. त्यावर भाजपeचे खासदार गिरीश बापट चार दिवसापूर्वी महापालिका आयुक्तांच्या घरी जाऊन पाण्याचा प्रेशर चेक केला. ज्यावेळी पुणे महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आला. त्यानंतर खासदार गिरीश बापट यांना हे अचानक का आठवले? नगरसेवक, आमदार, पालकमंत्री आणि खासदार अशा अनेक पदावर काम करणार्‍या नेत्यांनी पुणेकर नागरिकांची दिशाभूल यात केली आहे,” असा आरोप जगताप यांनी केलीय.

“तुम्ही २४ तास पाणी देणार होतात ते कुठे गेले? बापट नाटक करु नका. या फसवणुकीसाठी तुम्ही राजीनामा द्यायला हवा,” असंही जगताप म्हणाले.