पुणे : गेल्या पाच दिवसांत राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात १०.३८ टक्के, म्हणजेच १४८.७१ टीएमसी वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील धरण प्रकल्पांमधील पाणीसाठा ४७.३० टक्क्यांवर पोहोचला आहे. गुरुवारी (२५ जुलै) पहाटे सहा वाजेपर्यंत राज्यातील सर्व धरणांतील पाणीसाठा ६७६.६६ टीएमसी झाला.
यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे राज्यातील धरणांनी तळ गाठला होता. तसेच मोसमी पाऊस विलंबाने सक्रिय झाल्याने धरणे कधी भरणार याकडे लक्ष लागले आहे. राज्यातील धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता १४३०.६३ टीएमसी आहे. मात्र राज्यात सर्वदूर पाऊस सुरू असल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
हेही वाचा…पिंपरी : पवना धरण ७६ टक्के भरले
जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२५ जुलै) पहाटे सहा वाजेपर्यंत राज्यातील सर्व धरणांत मिळून ६७६.६६ टीएमसी पाणीसाठा झाला. कोकण विभागातील धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता १३०.८४ टीएमसी आहे. आता धरणांमध्ये १००.७३ टीएमसी (७६.९७ टक्के) पाणीसाठा झाला आहे. पुणे विभागातील धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता ५३७.२८ टीएमसी आहे. आता होत असलेल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठा २९७.८१ टीएमसीवर (५५.४४ टक्के) पोहोचला आहे. नाशिक विभागातील धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता २०९.६१ टीएमसी आहे. धरणांत ७७.१७ टीएमसी (३७.०६ टक्के) पाणीसाठा आहे. मराठवाडा विभागातील धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता २५६.४५ टीएमसी आहे. धरणांत ३४.०५ टीएमसी (१३.२७ टक्के) पाणीसाठा झाला आहे. अमरावती विभागातील धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता १३६.७५ टीएमसी आहे. धरणांत ६४.६६ टीएमसी (४८.४१ टक्के) पाणीसाठा झाला आहे. नागपूर विभागातील धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता १६२.७० टीएमसी आहे. धरणांत १०१.७० टीएमसी (६२.५१ टक्के) पाणीसाठा झाला आहे.
धरणनिहाय पाणीसाठा
(टीएमसी, टक्केवारी, (ए) एकूण, (उ) उपयुक्त).
बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे – मो. सागर (उ) ४.४९० (९८.६६ टक्के), तानसा (उ) ५.०८० (९९.३८ टक्के), विहार (उ) ०.९८० (१०० टक्के), तुलसी (उ) ०.२८० (१०० टक्के), म. वैतारणा (उ) ४.३३० (६३.५२ टक्के).
कोकण विभाग, ठाणे / रायगड – भातसा (उ) २४.१८० (७२.६७ टक्के), अ. वैतरणा (उ) ६.३१० (५३.९३ टक्के), देवघर (उ) २.१७० (६२.७४ टक्के).
पुणे विभाग – (पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर ) – माणिकडोह (उ) २.४५० (२४.१३ टक्के), डिंभे (उ) ६.२३० (४९.९१ टक्के), चासकमान (उ) ४.७३० (६२.४६ टक्के) पानशेत (उ) ८.१३० (७६.२६ टक्के), खडकवासला (उ) १.९७० ( १०० टक्के), भाटघर (उ) १५.७६० (६७.०४ टक्के), वीर (उ) ८.०५० (८५.५७ टक्के), मुळशी (उ) १४.०६० (६९.७५ टक्के), पवना (उ) ५.७७० (६२.४६ टक्के), उजनी (ए) ५५.७७० (४७.५७ टक्के), कोयना (ए) ७५.२६ (७१.५० टक्के), धोम (उ) ६.१८० (५२.९० टक्के), दूधगंगा (उ) १७.५३० (७३.१० टक्के), राधानगरी ७.६२० (९८.०७ टक्के).
नगर जिल्हा – भंडारदरा (ए) ८.२२१ (७४.४७ टक्के), निळवंडे (ए) २.९५३ (३५.४९ टक्के).
नाशिक/जळगाव जिल्हा –गंगापूर (उ) २.८१२ (४९.९५ टक्के), दारणा (उ) ५.८१७ (८१.३७ टक्के), गिरणा (उ) २.१७ (११.७४ टक्के), हतनूर (उ) २.९४० (३३.०२ टक्के).
मराठवाडा विभाग – जायकवाडी (ए) २९.१३१० (२८.४५ टक्के), येलदरी (उ) ८.६४२ (३०.२१ टक्के), पेनगंगा ( ईसापूर) (उ) १४.०७८ (४१.३५ टक्के), तेरणा (उ) ०.८३५ (२५.९२ टक्के).
हेही वाचा…पुणे : पावसामुळे आरटीओच्या कामकाजावर पाणी! जाणून घ्या लायसन्ससह इतर चाचण्यांचे बदललेले वेळापत्रक…
नागपूर विभाग – गोसी खुर्द (उ) ४.८७८ (१८.६६ टक्के), तोत. डोह (उ) २७.०८५ (७५.४५ टक्के), काटेपूर्णा (उ) १.१०० (३६.०६ टक्के), ऊर्ध्व वर्धा (उ) १२.०१७ (६०.७३ टक्के).