शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्याजवळील पाण्याची मुख्य वितरण नलिका मेट्रोच्या कामामुळे स्थलांतरित करण्याचे काम येत्या गुरुवारी (५ जानेवारी) करण्यात येणार आहे. तसेच चांदणी चौक येथे प्रथमेश सोसायटी लगत कोथरूड भागाला पाणीपुरवठा करणारी सोळा इंच जलवाहिनी दुरुस्तीची कामे गुरुवारी करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोथरूड आणि शिवाजीनगर भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी (६ जानेवारी) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.
हेही वाचा >>>पुणे : यूजीसीकडून दोन श्रेयांकांचा ‘कम्युनिटी एंगेजमेंट’ अभ्यासक्रम; अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध
दरम्यान, बाणेर,औंध भागाचा पाणीपुरवठा उद्या (बुधवार, ४ जानेवारी) बंद राहणार आहे. चतु:शृंगी पाणीपुरवठा विभागाअंतर्गत चतुःशृंगी टाकीच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी करण्यात येणार आहे.
शिवाजीनगर, कामगार पुतळा परिसर, शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय, कपोते गल्ली, सिमला ऑफीस परिसर, नरवीर तानाजी वाडी, पुणे-मुंबई रस्ता, वाकडेवाडी, पाटील इस्टेट, कोथरूड भागातील शास्त्रीनगर, लोकमान्य कॉलनी, डावी आणि उजवी भुसारी कॉलनी, वेद भवन रस्ता परिसर, डुक्करखिंड, हिलव्ह्यूव्ह सोसायटी, वूडस् रॉयल सोसायटी परिसर, परमहंसनगर, लक्ष्मीनगर परिसर, राहुल टॉवर, मुठेश्वर काॅलनी, गुरूजन सोसायटी या भागाचा पाणीपुरठा गुरुवारी बंद राहणार आहे. तर सकाळनगर, औंध रस्ता, आयटीआय रस्ता, औंध गाव, बाणेर रस्ता, पंचवटी, पाषाण, निम्हण मळा, लमाणतांडा वस्ती, पाषाण गावठाणाचा काही भाग, चव्हाणनगर, पोलीस वसाहत, अभिमान श्री सोसायटी, आंबेडकर चौक ते गोकुळी भोईटे वस्तीपर्यंतचा भाग, राजभवन, भोसलेनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, खडकी टाकीपर्यंतचा परिसर, रोहन निलय, औंध उजवीकडील सर्व बाजू, स्पायसर कॉलेज परिसर, आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे वस्तीपर्यंतचा भाग, बाणेर, बोपोडी इंदिरा वसाहत आणि कस्तुरबा वसाहत या भागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.