पुणे : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शहरात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. पोलिसांनी शहर, तसेच उपनगरात कडक बंदोबस्त ठेवला होता. शहरात कोठेही अनुचित घटना घडली नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शहर, तसेच उपनगरात दुपारनंतर जल्लोष करण्यात आला. जल्लोषानंतर कार्यकर्त्यांमध्ये होणारे वादावादीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकारी, अडीच हजार पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल, तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्या बंदोबस्तास तैनात करण्यात आल्या होत्या. दुपारी बाराच्या सुमारास निकालाचा कल स्पष्ट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. श्री जोगेश्वरी मंदिर, लाल महाल चौक, मंडई, शनिपार चौकात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. चैाकचौकात आतषबाजी करण्यात आली, तसेच गुलाल उघळण्यात आला.

हेही वाचा >>> Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीत प्रबोधन मंचाची कामगिरी ‘गेम चेंजर’

कोेरेगाव पार्क भागातील मतजमोजणी केंद्राच्या परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला. या भागातील रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी निकाल ऐकण्यासाठी या परिसरात गर्दी केली होती. ध्वनीवर्धकावरुन विधानसभा निहाय निकालाच्या फेरी जाहीर करण्यात आली. प्रत्येक फेरीचा निकाल जाहीर झाल्यनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. निकाल संपल्यानंतर सायंकाळी या भागातील रस्ते वाहतुकीस खुले करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune witnesses smooth and peaceful elections result day pune print news zws