पुणे : खासगी बँकेच्या व्यवस्थापकाशी संगनमत करुन पत्नीने संयुक्त खात्यातील ४० लाख रुपये काढून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांकडून पत्नी, बँक व्यवस्थापकासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा >>> “मी जर चिंता करत बसलो तर…”, उद्धव ठाकरेंचा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांना संदेश!
डॅरिल इव्हान रसकिन्हा (वय ४९, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी या संदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी नोएला डॅरिल रसकिन्हा (वय ४६), फ्लाविया पॅन्ड्रानिला परेरा, डेरेक रॉबिन्स (रा. वाघोली) तसेच बोट क्लब रस्त्यावरील एका खासगी बँकेच्या बोट क्लब रस्ता शाखेच्या व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> ‘जे बाळासाहेबांचे विचार विसरले तेच आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील,’ सुधीर मुनगंटीवार यांचे विधान
मिळालेल्या माहितीनुसार डॅरिल आणि नोएला पती-पत्नी आहेत. नोएला हिने अन्य संशयित आरोपींसोबत कट रचून कंपनी स्थापन करण्यासाठी डॅरिल यांच्याकडून दहा लाख रुपये घेतले. प्रत्यक्षात तिने कंपनी स्थापन न करता संयुक्त बँक खाते तसेच डिमॅट खात्यातील पाच लाख रुपये स्वत:च्या वैयक्तिक खात्यात वळवले.
हेही वाचा >>> “तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की आईचं दूध विकणारा…”, उद्धव ठाकरेंनी सांगितली ‘ती’ आठवण!
पैसे स्वत:च्या खात्यात वळविण्यासाठी या महिलेने खासगी बँकेतील बँकेच्या व्यवस्थापकाशी संगनमत केले. २५ लाख रुपये किमतीचे समभाग डॅरिल यांची बनावट सही करुन नोएला हिच्या खात्यात वर्ग करण्यात आले. प्राथमिक तपासात ४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.