पुणे : भर चौकात लघुशंका करणारा गौरव आहुजाची महागडी मोटार पोलिसांनी जप्त केली. आहुजाच्या मोटारीवर असलेले वाहन क्रमाकांची पाटी काढून टाकल्याचे निदर्शनास आले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांनी आहुजाला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गौरवबरोबर असलेला मित्र भाग्येश ओसवाल याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश याची येरवडा परिसरातून धिंड काढली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी गौरव मनोज आहुजा (वय २५, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) व त्याचा मित्र भाग्येश प्रकाश ओसवाल (वय २२, रा. मार्केट यार्ड) यांच्याविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाग्येश याला शनिवारी रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर पसार झालेल्या गैारवला रविवारी सकाळी अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पोलीस कोठडीची मुुदत संपल्यानंतर दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

भर चौकात अश्लील वर्तन करुन पसार झालेला गौरव याने त्याची मोटार कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील आंबपफाटा येथील पेट्रोल पंपाजवळ लावली होती. भाडेतत्त्वावर मोटार घेऊन तो कर्नाटकात पसार होण्याच्या तयारीत होता. पोलीस मागावर असल्याचे कळताच तो पुन्हा माघारी फिरला आणि सातारा जिल्ह्यातील कराड पोलीस ठाण्यात हजर झाला. गौरवला अटक केल्यानंतर तपासासाठी त्याला हातकंंणगले परिसरात नेण्यात आले. तेथून त्याची अलिशान मोटार जप्त करण्यात आली आहे, असे पोलिसांनी न्यायालायत सांगितले. याप्रकरणाचा तपास करायचा असल्याने गौरवला सात दिवस पोलीस कोठडी ठेवण्याची विनंती सरकारी वकील योगेश कदम यांनी केली. न्यायालयाने गौरवच्या पोलीस कोठडीत एक दिवस वाढ केली. त्याचा मित्र भाग्येश याला न्यायालायीन कोठडी मंजूर करण्यात आली. गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांची पोलिसांनी येरवडा परिसरात धिंड काढली. गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींना जरब बसविण्यासाठी त्यांची धिंड काढण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

उडवाउडवीची उत्तरे

गौरव आहुजा याची महागडी मोटार पोलिसांनी जप्त केली आहे. त्याच्या मोटारीवरील असलेली वाहन क्रमांकाची पाटी काढून टाकल्याचे दिसून आले आहे. वाहन क्रमांकाची पाटी कोणी काढली, याबाबत विचारणा केली असता गौरवने उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे पोलिसांनी न्यायालायात सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, याप्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याचे न्यायालयाने सांगितले.