पुण्यातील चंदननगर येथे मैत्रिणीकडे वाईट नजरेने का पाहतोस असे विचारल्याने दोघांनी एका तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंदन जयप्रकाश सिंग (वय 36 रा. साई सत्यम पार्क, वाघोली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, टिपू सुलतान फिरोज मनसुरी आणि अनिरुद्ध अमरीश राठोड अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी चंदननगर लेबर कॅम्पजवळ सुप्रिया भोसले आणि चंदन सिंग हे बोलत थांबले होते. त्यावेळी टिपू सुलतान फिरोज मनसुरी आणि अनिरुद्ध अमरीश राठोड हे सुप्रियाकडे वाईट नजरेने पाहत होते. त्यामुळे याचा जाब चंदन सिंग याने त्या दोघांना विचारला. त्यावर चंदनला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली, त्यानंतर डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला आणि आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. आरोपींचा कसून शोध घेतला जात असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

Story img Loader