पुणे : गुन्हेगारीवर बेतलेली गीते समाजमाध्यमातून प्रसारित करून दहशत माजविणे एका तरुणाच्या अंगलट आले. बिबवेवाडी भागातील एका तरुणाच्या विराेधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीवर बेतलेली गीते समाजमाध्यमावर प्रसारित करणे तसेच भर चौकात वाढदिवस करताना तलवारीने केक कापण्याचे प्रकार शहरात वाढीस लागले आहेत.

हेही वाचा… खंडाळा घाटात भीषण अपघात; कारमधील पाच प्रवासी ठार, तीन जखमी

Maheep Kapoor gatecrashed Sanjay Kapoor party
‘वन नाईट स्टँड’साठी मद्यधुंद अवस्थेत पार्टीत शिरली, नशेतच त्याच्या कुटुंबाला…; कपूर कुटुंबाच्या सूनेने सांगितली लव्ह स्टोरी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Dhankawadi gambling den, Raid on gambling den,
पुणे : धनकवडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहाजणांविरुद्ध गुन्हा
Rupali Ganguly
Video: “खोटं बोलून करिअर…”, ‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीचे आरोप; ईशा वर्माचा वडिलांवरही संताप
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना

गुन्हेगारीवर बेतलेली गीते तयार करून प्रतिस्पर्धी टोळीला आव्हान देणे; तसेच अशा प्रकारची गीते समाजमाध्यमात प्रसारित करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. बिबवेवाडी परिसरातील अपर इंदिरानगर भागात राहणाऱ्या ऋतीक मेहबूब शेख याने गुन्हेगारीवर बेतलेली गीते तयार केली होती. बिबवेवाडी, अपर इंदिरानगर भागात त्याने तयार केलेली गीते प्रसारित झाली होती. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांमध्ये शेख याची लोकप्रियता वाढली होती. समाजमाध्यमातून ही गीते प्रसारित झाल्याची माहिती खंडणीविराेधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याचा शोध घेतला आणि त्याच्या विरोधात कारवाई केली. शेख याच्या विरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून खंडणीविरोधी पथकातील पोलीस कर्मचारी प्रदीप गाडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

हेही वाचा… पुणे: …अन् ती महिला सावरकरांच्या फोटोलाच जोडे मारायला निघाली; शिंदे गटाच्या आंदोलनातील Video चर्चेत

अश्लील शब्द आणि प्रतिस्पर्धी टोळीला आव्हान

ऋतिक शेख याने ‘अपरची पोरं गुन्हेगार’ हे रॅपसाँग तयार केले होते. या गीतात अश्लील शब्द होते. गुन्हेगारी टोळीची दहशत त्याने गीतातून पसरविली होती. त्याने केलेले गीत गुन्हेगारी वर्तुळात लोकप्रिय झाले होते. अपर इंदिरानगर-बिबवेवाडी भागातील तरुणांमध्ये हे गीत लोकप्रिय ठरले होते. अश्लील शब्द, गुन्हेगारीचे उद्दात्तीकरण करणाऱ्या शेखने ध्वनिचित्रफीत तयार करून समाजमाध्यमावर प्रसारित केली होती. ही ध्वनिचित्रफीत खंडणीविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी पाहिली आणि त्वरित कारवाई केली. शेख याला ताब्यात घेण्यात आले. बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करत आहेत.

हेही वाचा… कोरडय़ा हवामानामुळे राज्यातील गारव्यात वाढ; पुढील चार दिवसांत तापमान वाढीचा अंदाज

तलवारीने केक कापणाऱ्यांविरोधात कारवाई

शहरात भरचौकात वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण मध्यरात्री चाैकात फटाके फोडून तलवारीने केक कापतात. समाजमाध्यमात ध्वनिचित्रफीत प्रसारित करून दहशत माजविली जाते. पुणे आणि पिंपरी परिसरात असे प्रकार करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी पिंपरीत समाजमाध्यमातील स्टेटसवर कोयता बाळगल्याचे छायाचित्र प्रसारित करणाऱ्या एका तरुणाविरोधात कारवाई करण्यात आली.