पुणे : तरुणाचा खून करुन मृतदेह खोक्यात बांधून फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. हडपसर भागातील हिंगणे मळा परिसरातील कालव्याजवळ खोके सापडले. खून झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हिंगणे मळा परिसरात शुक्रवारी सायंकाळी एक खोके नागरिकांनी पाहिले. तरुणाचे हात पाय बांधण्यात आले. खोके बंद करून ते कालव्याजवळ असलेल्या मोकळ्या जागेत फेकून देण्यात आले होते. याबाबतची माहिती रहिवाशांनी पोलिसांना दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहाेचले. खून झालेल्या तरुणाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष आहे. त्याची ओळख पटलेली नाही. खून झालेल्या तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती हडपसर पाेलिसांनी दिली.

हेही वाचा – पुणे : महापालिकेत ‘माननीयां’ची धावपळ, काय आहे कारण ?

हेही वाचा – पुणे : महंमदवाडी, हांडेवाडीतील दोन रस्ते असे तयार करणार ! ८८ कोटी ८३ लाखांच्या खर्चाला स्थायी समितीची मंजुरी

तरुणाचा खून वैमनस्य किंंवा अनैतिक संबंधातून झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांनी शहरातून बेपत्ता झालेल्या तरुणांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. खून झालेला तरुण हडपसर, लोणी काळभोर भागातील असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.