कात्रज तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. ज्ञानेश्वर शिवाजी पांचाळ (वय २३, रा. कात्रज) असे मरण पावलेल्या तरुणाच्या नाव आहे.

हेही वाचा >>>लष्करी जवानाच्या घरातून पावणेतीन लाखांचा ऐवज लांबविला

कात्रज तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यासाठी पांचाळ आणि त्याचे मित्र रविवारी सकाळी निघाले होते. त्याचे मित्र बोटीतून तेथे गेले. मात्र, पांचाळने पोहोत जाण्याचा निर्णय घेतला. पोहताना त्याची दमछाक झाली आणि तो पाण्यात बुडाला. पांचाळच्या मित्रांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पांचाळचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

हेही वाचा >>> पिंपरी चिंचवड : शंभर खोके मातोश्री ओके , ठाकरे- पवार चोर है अशा घोषणा देत वेदांता- फॉक्सकॉनवरून भाजप आक्रमक

कात्रज तलाव परिसरात सुरक्षारक्षक नसल्याने दुर्घटना घडली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम यांनी केली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

Story img Loader