देशभरात सध्या ‘मी टू’ विषयी चर्चा सुरू असून या पार्श्वभूमीवर पुण्यातील महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी एकत्रित येत एक आगळावेगळा उपक्रम सुरु केला आहे. लैंगिक अत्याचाराविरोधात स्त्रियांच्या मदतीसाठी या मुलांनी ‘We Together’ समितीची स्थापना केली आहे. या मोहिमेसंदर्भातील माहिती समिती सदस्य असणाऱ्या कल्याणी माणगावे यांनी आज पुण्यातील एका पत्रकार परिषदेमध्ये दिली.

‘मी टू च्या माध्यमातून महिला आणि तरुणीवर अन्याय अत्याचाराच्या घटना समोर येत आहे. अत्याचार झाल्यावर नेमकी दाद कुठे मागायची असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. याच पार्श्वभूमीवर आम्ही ९ विद्यार्थ्यांची ही समिती तयार केली आहे’ अशी महिती कल्याणी यांनी दिली. ज्या महिला किंवा तरुणींवर अन्याय झाला आहे त्यांनी या समितीकडे संपर्क साधल्यास त्यांना घडलेल्या प्रकारासंदर्भात दाद कुठे मागायची यासंदर्भातील योग्य ते मार्गदर्शन केले जाईल असे त्यांनी सांगितले.

सर्वच स्त्रियांच्या मदतीसाठी आम्ही ‘We Together’ समितीची स्थापना केल्याचे या तरुणांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.