पुणे : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची जळगाव जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे साडेतीन वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सर्वाधिक साडेतीन वर्षे काम केले. दरम्यान आर. एस. चव्हाण यांची पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पुणे : आरटीईच्या थकीत शुल्क प्रतिपूर्तीची शाळांना प्रतीक्षाच, दोन वर्षांसाठी केवळ ४० कोटींचा निधी मंजूर

आयुष प्रसाद यांनी पुणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक प्रशासकीय सुधारणा केल्या. प्रशासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर त्यांचा भर होता. शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया राबवण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. तसेच पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे मुलींसाठी निवासी शाळा उभारण्यात आली. शाळांची गुणवत्तावाढ, कुपोषणमुक्तीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. पुणे जिल्हा परिषदेत चांगले काम करत आल्याचा आनंद आहे. मात्र करोना काळातील जिल्हा परिषदेच्या मृत कर्मचाऱ्यांच्या स्मारकाचे काम पूर्ण होऊ शकले नाही याची खंत असल्याची भावना प्रसाद यांनी व्यक्त केली.