पुणे : जिल्हा परिषदेच्या ‘गट क’ आणि ‘गट ड’ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणात अविवाहित महिला कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासंदर्भात मिसाळ यांनी मंत्री जयकुमार गोरे यांना पत्र दिले आहे. ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदेच्या ‘गट क’ आणि ‘गट ड’ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणातील प्रकरण १ मध्ये कलम ३ (क) मध्ये विधवा, परित्यक्ता किंवा घटस्फोटीत महिला कर्मचाऱ्यांना सवलत देण्यात आलेली आहे. मात्र, यामध्ये ४० वर्षे आणि त्यावरील वयाच्या अविवाहित महिला कर्मचाऱ्यांना सवलत नाही. या कर्मचाऱ्यांवर त्यांच्या वयोवृद्ध पालकांची देखभाल आणि शुश्रूषेची जबाबदारी असल्यामुळे बदली धोरणात अविवाहित महिलांचाही समावेश करणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने यासंदर्भात शुद्धीपत्रक काढावे, असे मिसाळ यांनी या पत्रात नमूद केले आहे.