पुणे : जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गाच्या २१ पदांच्या एक हजार जागांसाठी ७४ हजार ५०७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात आरोग्यसेवक पदासाठी सर्वाधिक अर्ज आले असून, पदभरती परीक्षा सप्टेंबर अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या पदभरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यात अर्ज करण्यासाठी ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट अशी मुदत देण्यात आली होती. त्यात आरोग्य सेवक (पुरुष) या पदाच्या १२४ जागांसाठी सर्वाधिक २८ हजार २०९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर सर्वाधिक ४३६ जागा असलेल्या आरोग्य परिचारिका (आरोग्यसेवक महिला) पदासाठी ३ हजार ९३० अर्ज आले. कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या ३७ जागांसाठी ४ हजार ५७५, आरोग्य सेवक (पुरुष, हंगामी फवारणी) पदाच्या १२८ जागांसाठी २ हजार ८९८, औषध निर्माण अधिकारी पदाच्या २५ जागांसाठी ५ हजार ५७३, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या चार जागांसाठी १ हजार ४०५ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमधील पदपथ घेणार मोकळा श्वास

विस्तार अधिकारी (पंचायत) पदाच्या तीन जागांसाठी १ हजार ७८४, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) दोन जागासाठी ८१९, विस्तार अधिकारी (कृषी) दोन जागांसाठी १९३, विस्तार अधिकारी (शिक्षण) दोन जागांसाठी १४४, वरिष्ठ सहायकच्या आठ जागांसाठी ५ हजार ३१, पशुधन पर्यवेक्षकच्या ३० जागांसाठी ४६३, कनिष्ठ आरेखकच्या दोन जागांसाठी ६८, कनिष्ठ लेखा अधिकारी तीन जागांसाठी २१३ उमेदवारांनी अर्ज केला आहे. वरिष्ठ सहायक लेखा नऊ जागांसाठी ९५३, कनिष्ठ सहायक लेखाच्या १६ जागांसाठी १ हजार ९४०, कनिष्ठ सहायकच्या ६७ जागांसाठी ७ हजार ३१७, पर्यवेक्षिका पदाच्या नऊ जागांसाठी १६१, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, ग्रामीण पाणी पुरवठा) ३३ जागांसाठी ३ हजार ८३५, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (बांधकाम, लघु पाटबंधारे) ५९ जागांसाठी ४ हजार ८७३ आणि रिगमन दोरखंडवाला या पदाच्या एका जागेसाठी १२३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. दरम्यान, अर्ज प्रक्रियेतून जिल्हा परिषदेला ६ कोटी ६६ लाख ५२ हजार रुपये प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी दिली.

Story img Loader