पुणे : जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गाच्या २१ पदांच्या एक हजार जागांसाठी ७४ हजार ५०७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात आरोग्यसेवक पदासाठी सर्वाधिक अर्ज आले असून, पदभरती परीक्षा सप्टेंबर अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या पदभरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यात अर्ज करण्यासाठी ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट अशी मुदत देण्यात आली होती. त्यात आरोग्य सेवक (पुरुष) या पदाच्या १२४ जागांसाठी सर्वाधिक २८ हजार २०९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर सर्वाधिक ४३६ जागा असलेल्या आरोग्य परिचारिका (आरोग्यसेवक महिला) पदासाठी ३ हजार ९३० अर्ज आले. कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या ३७ जागांसाठी ४ हजार ५७५, आरोग्य सेवक (पुरुष, हंगामी फवारणी) पदाच्या १२८ जागांसाठी २ हजार ८९८, औषध निर्माण अधिकारी पदाच्या २५ जागांसाठी ५ हजार ५७३, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या चार जागांसाठी १ हजार ४०५ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा