आपल्या भारतीयांच्या सगळ्या प्राॅब्लेमवर एकच उपाय, तो म्हणजे चहा. त्यात जर मस्त तंदुरी चहा मिळाला तर…आहाहाहा मग तर सोने पे सुहागाच. पण हा तंदुरी चहा बनवण्याची कल्पना कुणाला सुचली हे तुम्हाला माहितेय का? याच प्रश्नाचं उत्तर शोधत आम्ही आलो आहोत पुण्यात. पुण्यातील अमोल राजदेव या तरुणाकडे तंदुरी चहाचं पेटंट आहे. पुण्यात त्याच चायला नावाचं दुकान आहे. इथेच पहिल्यांदा तंदुरी चहा बनवला गेला. चला तर मग आज तंदुरी चाय पे चर्चा करूया.
‘गोष्ट असामान्यांची’ या लोकसत्ता लाइव्हच्या विशेष मालिकेतील आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.