रिक्षा प्रवास महागणार असल्याने पुणेकरांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. पुण्यात रिक्षाचा प्रवास पहिल्या दीड किलोमीटरसाठी दोन रुपयांनी महाग होणार आहे. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी १ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामती शहरात नवे दर लागू होणार आहेत. पुणे आरटीओने रिक्षाच्या दरवाढीस मंजुरी दिली आहे. नवी दरवाढ ८ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. सध्या पहिल्या दीड किलोमीटरसाठी १८ रुपये घेतले जात आहेत. आता त्यासाठी २० रुपये मोजावे लागणार आहे. तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १२.१९ रुपयांऐवजी १३ रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ सहा वर्षानंतर झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महानगरपालिका क्षेत्राकरिता (पुणे व पिंपरी चिंचवड) रात्री १२ ते सकाळी ५ या कालावधीत २५ टक्के अतिरिक्त भाडेदर असेलमहानगरपालिक क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भागाकरिता रात्री १२ ते सकाळी ५ या कालावधीत ४० टक्के अतिरिक्त भाडेदर असेल.

गेल्या दीड वर्षांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणात करोना रुग्ण आढळून येत होते. करोना रोखण्यासाठी लागू असलेल्या निर्बंधांमुळे प्रवासी कमी होते. याचा फटका रिक्षाचालकांच्या आर्थिक गणिताला बसला. अनेक रिक्षाचालकांना दैनंदिन रोजगार मिळाला नाही. त्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली. त्यामुळे ही भाडेवाढ योग्य असल्याचं रिक्षाचालकांचं म्हणणं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punekar rickshaw journey will be expensive rmt 84 svk