पुणेरी.. हा शब्द आला की धोतर, कोट, उपरणं आणि डोक्यावर कोका, कमल, जरतार असणारी लाल चुटूक पगडी असे चित्र काही शतकभरांच्या येथील पिढय़ांनी तयार केले. पुण्यभूमीतच जन्माला आलेल्या, फक्त या संस्कृतीनगरीतच मिळणाऱ्या या शिरोभूषणाची ओळख देखील ‘पुणेरी पगडी’ अशीच आहे. हल्ली सत्कार, पुरस्कार समारंभ यांत बडेजावी प्रदर्शनासाठी आवर्जून दिली जाणारी ही पगडी घेताना पुण्याबाहेरील माणसांनाही अभिमान वाटतो. विद्वत्तेची मोठी परंपरा या दिमाखदार सांस्कृतिक घटकात आहे.

पगडी हे शिरस्त्राण म्हणजे डोके झाकण्याचे आभूषण. अगदी अर्वाचिन काळापर्यंत उघडय़ा डोक्याने बाहेर जाणे अशुभ मानले जाई. त्या वेळी वेगवेगळी घराणी, प्रांत, काम यानुसार शिरस्त्राणाचे भिन्न पर्याय होते. कोल्हापुरी फेटे किंवा पगडी, मावळी पगडी, शिंदेशाही पगडी, पेशवाई पगडी, फुले पगडी, मुंडासे, टोप असे अनेक प्रकार सांगता येतील. त्यातला पुण्याच्या भागात वापरला जाणार प्रकार म्हणजे पुणेरी पगडी. मायाजालावरही या पगडीचे मोठे कौतुक दिसू शकेल. पण या पलीकडे जाऊन नावापासून, कायदेशीर तरतुदींपर्यंत पुण्याची ओळख या आभूषणाने टिकवून ठेवली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
mhada bolinj loksatta news
वसई : बोळींज म्हाडा घरांच्या स्वस्ताईवर आधीचे खरेदीदार नाराज, फसवणूक केल्याचा आरोप
Why Hindu gods dance
हिंदू देवता नृत्य करतात तर इतर धर्मातील देव नृत्य करत नाहीत असे का?। देवदत्त पट्टनायक यांच्याबरोबर कला आणि संस्कृती
Prostitution risen in Nagpur
नागपुरात खुनाच्या घटनाच नव्हे, देहव्यापारही वाढला…गल्लोगल्ली उभारलेल्या मसाज-स्पामध्ये…
Loksatta anvyarth Minorities Politics Religious Sentiments Ram Temple
अन्वयार्थ:  कट्टरपंथाला आवरण्यासाठी…
Loksatta lokrang Hindustani Classical Music Zakir Hussain Music Tabla Playing 
झाकीरभाई…

न्यायमूर्ती रानडे यांनी ही पगडी नियमित वापरात आणली. लोकमान्य टिळक, तात्यासाहेब केळकर, सेतू माधव पगडी अशा अनेक व्यक्तींच्या इतिहासातून आपल्या मेंदूत उतरलेल्या छबीतून पगडी वगळता येणार नाही. सध्या तयार स्वरूपात मिळणारी ही पगडी पूर्वी कापड घेऊन बांधली जायची. माती किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा डोक्याच्या आकाराचा साचा बनवला जायचा. त्या साचावर कोष्टी म्हणजे विणकर समाजातील कारागीर दर पंधरा दिवसांनी घरोघरी जाऊन पगडी बांधून द्यायचे. सुती कापडाची लाल रंगाची पट्टी, त्याला बत्ती कापड असे म्हटले जायचे, ती कांजीत बुडवून त्याची घट्ट बांधलेली पगडी पंधरा दिवस टिकायची. या कापडामुळेच लाल रंग ही देखील ओळख या पगडीला मिळाली. बाजाराच्या मागणीनुसार रंग, कापड यांत आता फरक पडला आहे. पगडी तयार करण्याची पद्धतही बदलली आहे. मात्र त्याचे मूळ स्वरूप टिकवून ठेवले आहे. याबाबत तीन पिढय़ांपासून पगडीची परंपरा जपणाऱ्या मुरूडकर झेंडेवालेचे गिरीश मुरूडकर यांनी सांगितले, ‘आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या साच्यावरून कागदी लगद्याचा साचा तयार केला जातो आणि त्यावर कापड, स्पंज वापरून पगडी तयार केली जाते. आतून त्याला अस्तर लावले जाते. रेशीम किंवा सॅटिनच्या पगडीला अधिक मागणी असते. भगवी, जांभळी, राणी कलर, मोतिया अशा अनेक रंगात पगडी तयार केली जात असली तरीही त्याच्या मूळ लाल रंगाकडेच ग्राहकांचा ओढा आहे.’

सांस्कृतिक, ऐतिहासिक ओळखीपलीकडे कायदेशीर आणि व्यावसायिक ओळखही या पगडीला मिळाली आहे. ‘पुणेरी पगडी संघ’ या दहा सदस्यांच्या गटाने २००९ मध्ये या पगडीला बौद्धिक संपदा कायद्यानुसार भौगोलिक ओळख मिळवून दिली. त्यामुळे ‘पुणेरी पगडी’ ही अधिकृतपणे पुण्याची ओळख किंवा संपत्ती म्हणून गणली गेली आहे. कोणत्याही चित्रपट, फॅशन शो यात फारशी कधी दिसली नसली तरीही पुणेरी पगडीचे अप्रूप जगभरात टिकून आहे किंबहुना वाढते आहे. लग्न समारंभ, सत्कार, पुरस्कार यांपासून कॉलेजमधील ट्रॅडिशनल डेपर्यंत आणि अनेक घरांमध्ये शोकेसचा भाग म्हणून पुणेरी पगडी स्थिरावली आहे.

परदेशातही दिमाख

पुण्याची हद्द केव्हाच ओलांडून अनेक देशांमधून पगडीसाठी मागणी येत आहे. मुरूडकर, करंबेळकर, घम, देवळे, फटाले अशा अनेक घरातील तिसऱ्या -चौथ्या पिढय़ा या आजही पगडी तयार करण्याच्या व्यवसायात आहेत. गणेशोत्सवात गणेशमूर्तीला घालण्यासाठी, पांडुरंगाच्या मूर्तीसाठीही पगडी तयार केली जाते. परदेशातूनही दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर मागणी असते. फिलाडेल्फिया येथे होणाऱ्या गणेशोत्सवासाठी दरवर्षी पगडय़ा पाठवल्या जातात. येणाऱ्या पाहुण्यांना पुण्याची ओळख म्हणून शोकेसमध्ये ठेवता येईल अशी छोटी पगडी देण्याचाही कल वाढतो आहे. गेल्यावर्षी फ्रान्समधून आलेल्या शिष्टमंडळालाही पगडय़ा भेट देण्यात आल्या, असे मुरूडकर यांनी सांगितले.

उगमकथा

पगडी नेमकी कधी तयार झाली याचा ठोस तपशील सापडत नाही, मात्र अगदी पेशवाईच्या काळापासून ही पगडी वापरली जाते. या काळात त्याचे स्वरूप म्हणे थोडे वेगळे होते. त्यावेळी मोठा घेरा असलेल्या पगडीला ‘चक्री पगडी’ असे म्हटले जायचे. या आकारात कालांतराने थोडा बदल झाला आणि साधारण दीडशे वर्षांपूर्वी चक्री पगडीचे सुटसुटीत रुप तयार झाले. सध्या रुढावलेले पगडीरुप ते हेच. यामध्ये घेरा कमी करण्यापलीकडे त्याच्या मूळ रचनेत फारसे बदल झाले नाहीत. इंग्रजांच्या राजवटीत धोतर जाऊन पँट आली तरीही पगडी मात्र टिकून राहिली. या पगडीबाबतची उत्सुकता कायम टिकण्याचे एक कारण म्हणजे इतर सर्व प्रकारचे फेटे किंवा पगडय़ांपेक्षा वेगळी आणि वैशिष्टय़पूर्ण रचना. याच्या वरच्या भागाला माथा म्हटले जाते. उजव्या बाजूला असणारा उंच भाग म्हणजे कोका आणि त्याचे टोक म्हणजे चोच. पगडीचे देखणेपण हे या भागावर उवलंबून असते. याला असलेला गोंडा म्हणजे जरतार. पगडीच्या कडेच्या पट्टीला घेरा म्हटले जाते. घेऱ्याखाली कपाळावर येणाऱ्या भागाला कमल, तर आतील भागाला गाभा म्हटले जाते. पगडीवर केलेले जवाहिर काम, जरतार यांवर त्याची किंमत ठरत असे.

Story img Loader