पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे स्वागत अनोख्या पुणेरी पाट्यांनी केले जाणार आहे. यासाठी पुणेरी मेट्रोने हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोच्या बॅरिकेडची दुरुस्ती आणि सुशोभीकरण केले आहे. या बॅरिकेडवर पुण्याची सांस्कृतिक व औद्योगिक महती सांगणाऱ्या खोचक व मजेशीर पुणेरी पाट्या रंगविण्यात येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदी हे गणेशखिंड रस्त्याने जाणार असल्याने त्या मार्गावरील बॅरिकेडवर पुण्याची महती सांगणाऱ्या पाट्या लावण्याचा निर्णय पुणेरी मेट्रोने घेतला आहे. पुणेरी मेट्रोने आधीपासून बॅरिकेड रिकामे ठेवण्याऐवजी त्यावर कोपरखळी मारणाऱ्या आणि चिमटा घेणाऱ्या पाट्या रंगवल्या होत्या. या प्रयोगाला नागरिकांची पसंती मिळाली होती. आता मोदींच्या दौऱ्याचे निमित्त साधून बॅरिकेडवर पुण्याची सांस्कृतिक व औद्योगिक महती सांगणाऱ्या पाट्या झळकणार आहेत. या पाट्या केवळ महती सांगणाऱ्या असणार नाहीत, तर पुणेकरांची गुणवैशिष्ट्ये दाखविणाऱ्या असणार आहेत.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन, कसा आहे पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा?

याबाबाबत पुणेरी मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी समीर गोडसे म्हणाले, की बॅरिकेड म्हणजे एरवी निव्वळ सिमेंट आणि लोखंडाचा ठोकळा असतो. परंतु, पुणेरी मेट्रोच्या प्रत्येक बॅरिकेडवर विशेष काम केलेले आहे. पुणेकरांचे खास वैशिष्ट्य असणारी, कोपरखळी मारणारी पुणेरी पाटी, पुण्याचा सांस्कृतिक वारसा, पुणे विद्यापीठ, आयटी पार्कच्या माध्यमातून साधला जाणारा विकास या गोष्टी प्रकर्षाने लक्षवेधी ठरल्या आहेत. बॅरिकेडवरील पुणेरी पाटी वाहनचालकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलवणारी ठरली आहे.

हेही वाचा – PM Modi Pune Visit : पंतप्रधान साधणार सहा बड्या उद्योगपतींशी संवाद; दौऱ्यात खास वेळ राखीव

अशा आहेत पुणेरी पाट्या….

  • वेळ आल्यास लस जरूर टोचून घ्यावी, टोचून बोलण्याची सवय मात्र लगेच सोडून द्यावी!
  • मेट्रोचा प्रवास, सुखाचा सहवास!
  • उद्योग आणि तंत्रज्ञान पुण्याचा अभिमान!
  • थोडा त्रास होईल आज, सोय उद्याची असेल खास!
  • हा बोर्ड रंगविण्याची जबाबदारी आमची, कृपया थुंकून पार पाडू नये.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Puneri pati to welcome pm modi pune print news stj 05 ssb